‘देवेंद्र मध्यरात्री वेश बदलून…’; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई | आमच्यातील वाटाघाटीसाठी आणि चर्चांसाठी सगळे आमदार झोपल्यावर मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो, चर्चा करायचे आणि आमदार झोपेतून उठायच्या आतमध्ये मी हॉटेलवर यायचो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात सांगितलं. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

देवेंद्र रात्री वेश बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे. यादरम्यान वेगळाच पोशाख करुन, डोळ्यावर मोठा गॉगल लावून ते घराबाहेर पडायचे, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र साधारण खूप रात्रीपर्यंत काम करतात. दरम्यानच्या काळात जॅकेट वगैरे घालून ते घराबाहेर पडायचे. डोळ्यावर चष्मा वगैरे घालायचे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मलाही कधीकधी ओळखायला यायचं नाही. त्यावर मी त्यांना विचारलंही, की नवीन काही सुरु आहे का? तर उत्तर न देता ते प्रश्न टाळायचे. पण मला वाटायचं की काही ना काही मोठी राजकीय घडामोड सुरु आहे, असं ते म्हणालेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मी कधी भेटायचो हे आमच्या आमदारांनाही माहिती नव्हतं. सगळे आमदार झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि आमदार उठायच्या आधी पुन्हा हॉटेलवर परतायचो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

“चार लोकांच्या कोंडाळ्यानं आमच्या उद्धवसाहेबांना बावळट केलं” 

महाराष्ट्रासाठी जे जरूरी होतं तेच झालं -अमृता फडणवीस

रशिया-युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा, शिवसेनेच्या गोटात खळबळ