मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. तसेच कोरोनाच्या नव्या व्हेरियंट (Omicron) ने सर्वांची चिंता वाढवली आहे. मात्र मुंबईतील कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत घसरण होत झाल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येने गेल्या काही दिवसांत उच्चांक गाठला आणि आता लवकरच या संख्येत आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याचं टास्क फोर्सच्या सदस्यांनी म्हटलं आहे.

गेल्या चार पाच दिवसांमध्ये आम्ही एक ट्रेंड पाहिला त्यामुळे रूग्णांची संख्या आणखी कमी होऊ शकते. तीन कारणांमुळे रूग्णांच्या संख्येत घसरण होऊ शकते. पहिलं म्हणजे अनेकांनी स्वत:ला क्वारंटाईन केलंय. तसेच अणेक जण सध्या घरी आहेत. बरेच नागरिक घरी स्वत: टेस्ट करून घेतायेत आणि त्याबाबत माहिती देत नाहीयेत, असं टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी सांगितलं आहे.

मुंबईतील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत 7 जानेवारीपासून घसरण होतीये. शनिवारी मुंबईमध्ये 20 हजार 971 रूग्णांची नोंद झाली आहे. तर रविवारी 19 हजार 474 रूग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे.

सोमवारी रूग्णसंख्येत आणखी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी 13 हजार रूग्णांची नोंद झाली. तसेच मंगळवारी हा आकडा आणखी कमी झाला असून मंगळवारी 11 हजार रूग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही” 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती 

काळजी घ्या…, कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ‘ही’ नवी लक्षणं 

नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! 

“…म्हणून ओमिक्रॉन व्हेरिएंटला वेगाने पसरू दिलं पाहिजे”