खडसे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील- चंद्रकांत पाटील

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार घोषित करुन त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. निष्ठावंतांना डावलून, बाहेरुन आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत हे तिघेही समजूतदार असतील, ते स्वतःच स्वतःला समजावून सांगतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवार घोषित केले. चारही जणांनी अर्ज भरले. उमेदवारीबाबत केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आम्ही चार उमेदवार उभे केले कारण आमची ताकद आहे. चौथा उमेदवार हा आमचा अधिकार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलंय.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबईतील ‘या’ 18 वर्षीय तरुणाच्या कंपनीत रतन टाटांकडून गुंतवणूक

-पक्षाला ज्यांनी शिव्या घातल्या त्यांना तिकीट दिलं; उमेदवारी डावलल्यानंतर खडसेंचं आक्रमक रूप

-गरीबांच्या खात्यात साडे सात हजार रूपये जमा करा; राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

-पदवी, पदव्युत्तर परीक्षांबाबत उदय सामंतांचा मोठा निर्णय, वाचा कुणाच्या होणार परीक्षा अन् कुणाच्या नाही…!

-दिग्गजांना बाजूला सारत भाजपने विधानपरिषदेसाठी 4 उमेदवार केले जाहीर!