“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या”

भंडारा | शेती परवडत नाही, त्यामुळे तुम्ही जशी किराणा दुकानात वाईन (Wine) विक्रीला परवानगी दिली तशी आम्हा शेतकऱ्यांनाही (Farmer) द्यावी, अशी मागणी एका शेतकऱ्यांने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केली आहे.

या शेतकऱ्याने उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्याचं हे पत्र जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलं आहे. जयगुनाथ गाढवे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

जयगुनाथ हे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या निलज बु. गावातील रहिवासी आहे .त्यांच्या या पत्राची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

गावात चक्रीवादळ आले, चक्रीवादळात पिकाचे प्रचंड नुकसान झालं. नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले. मात्र अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच शासनाने मागील वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे बोनस बंद केलं आहे, असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे.

शेतकरी आडचणीत सापडला आहे. दुसरीकडे शेतासाठी होणारा खर्च देखील पिकांमधून वसूल होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मुलांना लागणारी फी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी लागणारा खर्च कुठून आणायचा असे सवाल या पत्रात गाढवे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, त्यामुळे मला मुख्यमंत्री साहेबांनी वाईन विक्रीची परवानी द्यावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर 

गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; पी. चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य 

“म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही” 

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला Omicron चा नवा व्हेरिएंट 

“अजित पवार ऐकत नाहीत पण बडे साहब सब देख रहे है”; फडणवीसांकडून आरोपांची सरबत्ती