कोरोनातून बरं झाल्यानंतर आजीने डॉक्टरांना मारली मिठी, पाहा भावूक करणारा फोटो

मुंबई| संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

असा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

अशातच एक मन हेलावून टाकणारा फोटो समोर आला आहे. 75 वर्षीय आजींनी कोरोनातून बरं झाल्यानंतर डॉक्टरांना मिठी मारली आहे.

ट्विटरवर समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टरांचे नाव डॉ. अभिशिक्ता मुळीक आहे. पीपीई कीट घातलेल्य या डॉक्टरचा आणि वृद्ध महिलेचा फोटो पाहून ही महिला किती एकटी पडली असावी हे दिसून येतं. इंडिया टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार कोलकात्यातील रुग्णालयातून हा फोटो समोर आला आहे.

हा फोटो पाहून लोक भावूक झाले आहेत. अनेकांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव या पोस्टवर केला आहे. एका युजरनं डॉक्टरर्स आपल्याला सुरक्षा देण्यासाठी आहेत. तसंच आपल्याला देव नाही तर डॉक्टर वाचवत आहेत, असं म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

कोरोनामुक्त झालेल्या तरूणाने अनोख्या पद्धतीने केला आनंद…

‘या’मुळे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर होतोय सोशल…

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी करू…

जाणून घ्या!कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना, वजन कमी…

…म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबांनी ट्रेन समोर उडी…