कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मदतीसाठी सरसावले ‘हे’ उद्योगपती

मुंबई | उद्योग श्रेत्रातील बड्या कंपन्यांनी आणि व्यक्तींना कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मदतीची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मदतीची घोषणा केली. त्यानंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी मदतीचे घोषणा केली आहे.

अनिल अग्रवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी 100 कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी करोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी 5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे करोना संकटावर मात करण्यासाठी पुढे आलेले पहिले उद्योगपती ठरले आहेत.

रविवारी त्यांनी ट्विटवरुन केलेल्या घोषणेमध्ये आपला संपूर्ण पगार करोनाविरुद्ध लढण्यासाठीच्या निधीला देणार असल्याचं महिंद्रांनी जाहीर केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी जिओचा खास प्लॅन लाँच; मिळणार तब्बल 102 जीबी डेटा

-“चीनने आपल्या कोरोना व्हायरससंबंधी लवकर माहिती द्यायला हवी होती”

-अमेरिकेत कोरोनाची दहशत; 24 तासांत 100 जणांचा मृत्यू

-“संकट किती भयंकर आहे ह्याची कल्पना काही लोकांना नाही, आता संचार बंदी लागू करा”

-मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 3 वर