मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर

मुंबई | देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमिक्राॅनचा संसर्ग वाढला असून अनेक राज्यांमध्ये मिनी लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर शनिवारी महाराष्ट्र सरकारानेही नवे निर्बंध लागू केले आहेत.

यामध्ये शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतू राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षीदेखील परीक्षा पुढे ढकलल्या जातात का? की वेळापत्रकानुसारच होणार याबाबत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं आहे.

ओमिक्राॅनच्या वाढत्या केसेस लक्षात घेता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यात अनेक बाधित रुग्णांनी कोविडच्या लसीचे दोन डोस घेतले आहेत.

भविष्यात करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यास प्रत्यक्ष परीक्षा होऊ शकत नसल्यास कोणत्या पद्धतीने मूल्यमापन करता येईल याचा विचार आधीच करायला हवा. तसेच दुसऱ्या पर्यायाचा विचार करायला हवा, अशी मागणी शिक्षक आणि पालकांमधून होत आहे.

दरम्यान, देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 79 हजार 723 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 146 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 7 लाख 23 हजार 619 वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येचा पॉझिटीव्हीट दर 13.29 वर पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पोस्टाची भन्नाट योजना; दरमहिन्याला पैसे कमवण्याची संधी 

‘या’ 5 राज्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर दिसणार नाही नरेंद्र मोदींचा फोटो! 

‘जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज…’; आयआयटीतील तज्ज्ञांचा मोठा दावा 

हिंदूचं घर जळालं तर मुस्लिमाचं घर थोडीच सुरक्षित राहील- योगी आदित्यनाथ 

Skin Care | दुधाचे हे फेसपॅक वापरा अन् आणि मिळवा तजेलदार त्वचा!