Top news

विजेच्या झटक्यामुळं होत्याचं नव्हतं झालं; तीन चिमुकल्या सख्ख्या बहिणींना एकसाथ नेलं

यवतमाळ | राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथे विजेच्या झटक्याने तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकमेकींना वाचवन्याच्या प्रयत्नात या तीनही बहिणींनी जागीच प्राण सोडले आहेत.

रिया भुसेवार (वय 6), मोनिका भुसेवार (वय 4) आणि मोंटी भुसेवार (वय 2) या तीन सख्ख्या बहिणी गुरुवारी सकाळी घरात जेवण करत होत्या. यावेळी मोठी बहीण कुलर चालू करण्यसाठी गेली मात्र तिला विजेचा झटका बसला. मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी तिची दुसरी बहीण गेली तिलाही विजेचा जोरदार झटका बसला. आपल्या मोठ्या दोन सख्ख्या बहिणींना झटका बसलेला पाहून सर्वात छोटी बहीण त्यांना वाचवायला गेली मात्र तिलाही झटका बसला.

विजेच्या झटक्यामुळे या तीनही बहिणींनी जागीच प्राण सोडले. ज्यावेळी मुलींना विजेचा झटका बसला त्यावेळी घरामध्ये कोणीही नव्हतं. मुलींचे वडील शेतात गेले होते तर आईसुद्धा बाहेर गेली होती. पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

सहा वर्षाखालील चिमुरड्यांचा असा एकसाथ मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणे • महाराष्ट्र अयोध्येत बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं- आनंद शिंदे

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने प्रकरणावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतापल्या; म्हणाल्या…

पत्नीला रोगानं ग्रासलं, नातेवाईकांनी त्याला नाकारलं; तो मात्र एकटाच जळत राहिला!

आईसोबत खेळत असताना बाल्कनीतून तोल जाऊन 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

‘होय मी अनेकांचे खून केले, कित्येकांच्या किडण्याही काढल्या’; डॉक्टरचा धक्कादायक जबाब