‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून 35 हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माविआ सरकारवर टीका केली आहे. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या या टीकेला आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरवण्यात आले आहेत. तर, 35,221 ठिकाणी आवाजाच्या मर्यादेतच लाऊडस्पीकर वाजविण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बुधवारपर्यंत राज्यातील विविध प्रार्थनास्थळाहून तब्बल 10,923 लाऊडस्पीकर काढून घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला 

“…मग केंद्र सरकार काय फक्त घंटा वाजवायला बसलंय का?” 

सचिन पायलट यांच्या इशाऱ्याने राजस्थानमध्ये खळबळ; काँग्रेसचं टेंशन वाढलं 

Pune | पुणेकरांना झटका देणारी बातमी समोर; सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ