यापुढे ही तुमचं प्रेम असंच राहू द्या; कोरोनातून सावरल्यानंतर आव्हाडांची फेसबुक पोस्ट

मुंबई | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण झाली होती. मागच्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर त्यांनी मात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या समर्थकांसाठी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल, असं ते म्हणाले आहेत.

माझ्या कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड शरद पवारसाहेब ,जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे उद्धवजी ठाकरे, सुप्रियाताई सुळे, अनिल देशमुख ,जयंत पाटील, राजेश टोपे, मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले,  असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती. महिन्याभरानंतर मी आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांसाठी पुन्हा असेल, असं आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अपने कदमों के काबिलियत पर… विश्वास करता हूं ,… कितनी बार तूटा लेकीन अपनो के लिये जीता हूं … चलता रहूंगा पथपर…चलने मैं माहीर बन जाऊंगा… या तो मंजिल मिल जायेगी… या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा, अशी शायरी त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-अजानसाठी लाऊड स्पीकरचा वापर बंद करावा- जावेद अख्तर

-राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार… मात्र दिलासादायक बाब म्हणजे 3800 बरे होऊन घरी!

-“पालघर हत्याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडून काढून सीबीआयकडे द्यावी”

-अमित शहांच्या तब्येतीविषयी अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक

-मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज- आयुक्त शेखर गायकवाड