महाराष्ट्रातील लेकींना भाजपच्या लोकांपासून धोका; रूपाली चाकणकरांचा भाजपवर गंभीर आरोप

औरंगाबाद | महाराष्ट्रातील लेकींना भाजपच्या लोकांपासून धोका आहे. अन्यथा, महाराष्ट्र आपोआप सुरक्षित होईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेण्यात आला होता. तेव्हा त्या माध्यमांशी बोलत होत्या.

महिला सुरक्षेवरुन राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे गृहमंत्रीपद असताना महिला संरक्षणासाठी कोणता कायदा आणला?, असा सवाल करत चाकणकरांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

महिलांबद्दल राम कदम, गिरीश महाजन, गिरीश बापट यांनी अपशब्द वापरले. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहेत. या नेत्यांना फडणवीसांनी सुधारावं, असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकानिहाय महिला दक्षता समिती स्थापन करणार आहे. समिती पीडितांना पाठबळ देणार आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून लवकरच योजना जाहीर होणार असल्याचंही चाकणकर यांनी यावेळी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या- 

-“मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली लाचारी दाखवून दिली”

-पंकजांच्या पराभवाचा फेटा खासदार कोल्हेंनी परळीत जावून बांधला

-अजून किती दिवस इंदोरीकरांच्या वक्तव्याचं भांडवल करणार आहात- सिंधुताई सपकाळ

-“मुस्लिमांची दाढी कुरवाळणारी शिवसेना औरंगाबादचं संरक्षण करेल काय?”

-मित्र असावा तर तो अमोल कोल्हेंसारखा- धनंजय मुंडे