अजून किती दिवस इंदोरीकरांच्या वक्तव्याचं भांडवल करणार आहात- सिंधुताई सपकाळ

शिर्डी | प्रसिद्ध कीर्तनकार  ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर आपल्या खुमासदार शैलीत कीर्तन सांगतात. मात्र त्यांनी आपल्या कीर्तनात सांगितलेल्या ऑड-इव्हनच्या फॉर्मुल्यामुळे ते चांगलेच गोत्यात आले. यावर इंदोरीकरांच्या वक्तव्याचं किती भांडवल करणार, असं ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

इंदोरीकरांच्या वक्तव्यावर अजून किती दिवस वाद घालणार आहात. त्याने काही साध्य होणार नाही. त्यांनी काय खून केला नाही. त्यांचं कार्य महान आहे. समाजप्रबोधनात त्यांच्या कामचा मोलाचा वाटा असल्याचं सिंधुताई सपकाळ यांनी म्हटलं आहे. याआधीही या प्रकरणवरून सिंधुताईंनी महाराजांचं समर्थन केलं होतं.

टीकाकाऱ्यांनीही महाराजांच्या शब्दांना धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेवून वाद मिटवता घ्यावा, असं सांगत ताईंनी राज्यात सुरू असलेल्या वादाबद्दल खंत व्यक्त केली होती.

दरम्यान, इंदोरीकरांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यासोबत त्यांनी इंदोरीकरांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“मुस्लिमांची दाढी कुरवाळणारी शिवसेना औरंगाबादचं संरक्षण करेल काय?”

-मित्र असावा तर तो अमोल कोल्हेंसारखा- धनंजय मुंडे

-“फक्त आणि फक्त पत्नीमुळं देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढत आहेत”

-शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना काहीही अडचण येऊ देऊ नका- मुख्यमंत्री

-तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना दाखवला कायद्याचा धाक; वकिलामार्फत धाडली नोटीस