कोरोना असल्याच्या संशयाने तरुणीला फेकल बस बाहेर, तिथेच झाला मृत्यु

उत्तरप्रदेश-  सध्या कोरोनाचा प्रसार आणि प्रचार हा त्याच्या उपाययोजनांसाठी न होता त्याच्या अपप्रचारासाठीच जास्त होत असल्याच दिसून येत आहे. आपणाला रोगाशी लढायच आहे रोग्याशी नाही हे वारंवार सांगुनसुध्दा काही लोक भितीपोटी आपल्याच माणसांशी तुच्छतेने वागत असल्याच दिसत आहे. अशातच काल नोएडा मध्ये एका तरुणीला कोरोनाची बाधा झाली आहे अशा संशयावरुन तिला बस मधुन खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. व त्या मध्येच त्या तरुणीचा मृत्यु झाल्याची माहीती समोर आली आहे.

दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातल्या नोएडा इथे ही घटना घडली. यु.पी. रोडवेजच्या बसने ही युवती नोएडाहून तिचं गाव असलेल्या सिकोहबादला निघाली होती. आई आणि बहीण बसमध्ये चढल्या तेव्हा तिची प्रकृती ठणठणीत होती, असा दावा या तरुणीच्या भावाने केला आहे. बसमधून फेकल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा त्याचा आरोप आहे. मात्र तिचा मृत्यु हा नैसर्गिक असल्याच पोलिसांच म्हणणे आहे.

युपी रोडवेजच्या बसमधुन प्रवास करत असताना ती आजारी असल्याच दिसताच बस करमचाऱ्यांना तिला कोरोना संसर्ग असल्याचा संशय आल्यमुळे त्यांनी तिला बसमधुन खाली उतरायला सांगितल. पोलिसांच्या माहितीनुसार, 19 वर्षांच्या अंशिका नावाच्या या तरुणीचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला आहे. अशिंकाच्या शरीरावर मारहाणीच्या किंवा झटापट झाल्याच्या कुठल्याही खुणा नव्हत्या, असं पोलिसांनी सांगितलं. हा नैसर्गिक मृत्यू असल्याने गुन्हा नोंदवला नसल्याचं पोलिसांमी सांगितल आहे. दरम्यान, पोस्ट मार्टेमचा रिपोर्टसुद्धा नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगतो, असं पोलिस म्हणाले.

माझी बहीन आणि आई एकत्रच बसमध्ये चढल्या ती चढत्यावेळी व्यवस्थित होती अस तिच्या भावाच म्हणण आहे.  उकाड्यामुळे तिचा जीव घाबऱ्या होउन तीची शुध्द हरपली आणि त्याच वेळी तिला बसमधुन खाली उतरवण्यात आल्यामुळेच तिच मृत्यु झाल्याचा आरोप अशिंकाच्या भावाने केला आहे.

अशिंकाचे वडील  सिक्युरिटी गार्ड म्हणून नोएडात नोकरी करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! तृथीयपंथीयांनी कापले तरुणाचे गुप्तांग

-माझ्या आईला त्यांने असं मारल, मुलीनेच सांगितले ‘त्या’ रात्रीच रहस्य

-मुलांसोबत खेळली म्हणून बापाने केली मुलीलाअमानुष शिक्षा, मुलीची आत्महत्या