पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ काळाच्या पडद्याआड

पुणे | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका विद्या बाळ यांचं निधन झालं आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. विद्या बाळ या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

विद्याताईंचं पार्थिव संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रभात रोड येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये विद्याताई सक्रीय होत्या.

लेखिका आणि संपादक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. विद्याताईंचं ‘मिळून साऱ्याजणी’ हे मालिक अत्यंत गाजलं होतं. महाराष्ट्रातील आणि भारतातील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

विद्या बाळ  यांचा जन्म 12 जानेवारी 1937 रोजी झाला. त्यांनी 1958 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. अर्थशास्त्र ही पदवी घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-

-आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; चव्हानांनी घेतला आव्हाडांचा समाचार

-इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात…

-ऐसे कैसे चलेगा खानसाब?; पुणे पोलिसांचं ट्विट

-सतास्थापनेचे शिलेदार खासदार संजय राऊत सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच गेले मंत्रालयात

-“एसआयटीचा तपास झाला तर ज्यांनी खरोखरच दंगल भडकवली त्यांची नावे त्यातून बाहेर येतील”