काळजी करू नका, पुण्यातील परिस्थितीवर अजितदादांचं बारकाईनं लक्ष आहे- उद्धव ठाकरे

पुणे | काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोरोना आढावा बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. यावेळी पुणेकरांना निश्चिंत रहा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या परिस्थितीवर मात करून गंभीर झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन आणि आरोग्ययंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यासोबतच अजितदादांचं पुण्यातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सुरुवातीला मुंबईतील परिस्थिती देखील गंभीर होती. काहीच कळत नव्हतं नेमकं काय करावं. कारण कोरोना कोणतंही औषध नाही. फक्त कोणत्या औषधांनी रुग्ण बरे वाटेल हे सर्व अंदाजच होते. चाचण्या, औषधोपचार सर्व गोष्टीवर चर्चा केली. सुरूवातीला सगळ्याच यंत्रणा खुप पॅनिकमध्ये होत्या. नंतर परिस्थिती आटोक्यात येत गेली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात, असंही ठाकरेंनी सांगितलं

महत्वाच्या बातम्या-

कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवांरानी चांगलंच झापलं; जनाची नाही तर

“…नाहीतर नेहमीप्रमाणेच ‘शिक्षणाच्या आयचा घो’ होईल”

विजेच्या झटक्यामुळं होत्याचं नव्हतं झालं; तीन चिमुकल्या सख्ख्या बहिणींना एकसाथ नेलं

“महिला सुरक्षेवर न थकता भाषणं देणारे नेते कुठं आहेत?, सरकारला केव्हा जाग येणार आहे”

सलाम सोनू! 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी, वाढदिवसानिमित्त सोनूनेच दिलं सर्वांना गिफ्ट!