वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | गेल्या दीड वर्षापासून जगावर कोरोनाचं (Coronavirus) संकट आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे कोरोनाचं संकट टळलं असं वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूने डोकं वर काढलं आहे.

कोरोनाचा नवा व्हॅरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक गतीने होत असल्याचं दिसून येत आहे. दे देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचं आरोग्य विभागामार्फत वारंवार सांगण्यात येत आहे. अशात दक्षिण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

दक्षिण रेल्वे विभागाने याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेने या संदर्भात ट्विट केलं आहे. सोमवारपासून चेन्नई उपनगरी रेल्वे प्रवासासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांना कोरोना संदर्भात असणाऱ्या नियमावलीचे पालन करावं लागेल, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सोमवारपासून चेन्नई लोकल ट्रेनमध्ये (Chennai local train) केवळ अशाच लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावं, असं दक्षिण रेल्वेच्यावतीने सांगण्यात आलंय. मास्क नसलेल्या प्रवाशांकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचेही रेल्वे विभागाने स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख 

मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत महत्वाची माहिती समोर

पोस्टाची भन्नाट योजना; दरमहिन्याला पैसे कमवण्याची संधी 

‘या’ 5 राज्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर दिसणार नाही नरेंद्र मोदींचा फोटो! 

‘जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात दररोज…’; आयआयटीतील तज्ज्ञांचा मोठा दावा