‘लग्न झालेल्या पुरुषांमध्ये…’; आझमा फलाहच्या वक्तव्याची एकच चर्चा

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतचा लाॅकअप हा शो सध्या चर्चेत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा शो चर्चेचा विषय असतो. प्रिन्स नरुला आल्यानंतर या शोमध्ये जास्तच गोंधळ माजलेला दिसतोय.

अशातच आता या शोमधील आझमा फलाहच्या वक्तव्याची एकच चर्चा होताना दिसत आहे. आझमा सध्या प्रिन्सच्या प्रेमात बुडाल्याचं दिसत आहे. भांडण करता करता ती चक्क प्रेमात पडली आहे.

आझमा प्रिन्सच्या प्रेमात इतकी वेडी झालीये की, तिला प्रिन्सचं लग्न झालं आहे याचा काहीच फरक पडत नाही, असं दिसतंय. प्रिन्सचं लग्न झालंय म्हणूनच तो मला जास्त आकर्षित करतोय, असंही ती यावेळी म्हणाली.

तो खूप हॅडसम दिसतो. तो माझा क्रश बनला आहे. सुरुवातीला चांगला नाही वाटला, पण आता मला आवडायला लागलाय, असंही ती यावेळी म्हणाली आहे. आझमाच्या या वक्तव्यानंतर प्रिन्सने देखील तिला पाहून भावूक झाला.

तु खूप सुंदर दिसतेस, असं प्रिन्स म्हणाला. त्यानंतर आझमा ते ऐकून लाजते आणि जेलमध्ये नाचत सुटते. त्यावेळी सगळे तिला पाहत असल्याचं दिसतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

“निव्वळ लज्जास्पद, एवढीच तुमची मदुर्मकी?…”, राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर फडणवीस कडाडले

BIG BREAKING: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

आत्ताची मोठी बातमी! राणा दाम्पत्यास अखेर अटक; पोलीस स्टेशनबाहेर तणावाचं वातावरण

“मर्द आहात ना?…”, नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

“…म्हणून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये”