“सरकारला वशिलेबाजीला प्रोत्साहन द्यायचं आहे का?”

मुंबई| राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला होता, आता त्यांच्या पाठोपाठ भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनीदेखील या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

राम सातपुते यांनी खासगी एजन्सीद्वारे होणाऱ्या मेगा भरतीवर आक्षेप घेतला आहे, या संदर्भात एक ट्वीट करत त्यांनी सरकारला जाब विचारला आहे. गरीबांच्या पोरांनी साहेब व्हायचं स्वप्न बघायचं की नाही? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. तसंच महाराष्ट्र शासनानं जाहिर केलेली ही मेगा भरती पारदर्शक होणार का? असा सवाल देखील त्यांनी सरकरला विचारला आहे.

सरकार ही मेगा भरती खासगी एजन्सीद्वारे करायला लागल आहे. परंतु ही मेघाभरती  एम पी एस सी च्या माध्यमातून व्हायला हवी. सरकारला वशिलेबाजीला प्रोत्साहन द्यायचं आहे का? असा सवाल सातपुते यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार राहित पवार यांनी देखील सरकारच्या या निर्णयावर सरकारला जाब विचारला होता. त्यांच देखील म्हणनं हेच आहे की यातून गरिब मुलांना किती फायदा होईल. ही मेगा भरती  एम पी एस सी च्या माध्यमातून व्हायला हवी असंच त्यांच देखील मत आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

जुन्या खोंडांना नकार; शिवसेनेची पहिली पसंती प्रियांका चतुर्वेदी!

-विधानसभेनंतर राज्यसभेचंही तिकीट नाही; त्यावर नाथाभाऊ म्हणतात…

-ज्यांच्या नावाची चर्चा त्यांचा पत्ता कट… भाजपने दिली तिसऱ्यालाच उमेदवारी

सुपरस्टार रजनीकांत राजकारणाच्या आखाड्यात; करणार नवीन पक्षाची स्थापना

-राहुल गांधींनी पदरी पडलेल्या संधीचे वाटोळे केले; संघाचे टिकास्त्र