#corona | गर्दी टाळा नाहीतर…; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद राहणार नाहीत. मुंबईतील लोकलसेवा, बससेवा सुरूच राहील. मात्र लोकांनी घराबाहेर पडायचं टाळायला हवं. गर्दी ओसरली नाही, तर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जे करता येणे शक्य आहे, अशा सर्व उपाययोजना आम्ही करीत आहोत. व्यावसायिकांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने मुंबईत बंद ठेवावीत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

गर्दी होत राहिली तर नाइलाजाने काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती बिघडल्यास लोकलसेवा बंद करावी लागणार, हे सांगायला ते विसरले नाहीत.

दरम्यान, केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या किटचा वापर करूनच सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. कारण या किट योग्यप्रकारे प्रमाणित करून आलेलं असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अनोखा उपक्रम

-कोरोनाचा फटका राज ठाकरेंनाही; मेळावा करावा लागला रद्द

-“सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही मात्र कमी उपस्थितीत काम करण्याबाबत विचार”

-पाकिस्तानमध्येही झाला कोरोनाचा शिरकाव

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई रेल्वेने घेतला हा निर्णय