देश

काॅंग्रेसच्या महिला खासदाराचा ‘हा’ व्हीडिओ तुफान व्हायरल

नवी दिल्ली | काँग्रेसच्या खासदार विप्लव ठाकूर यांनी राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारची जोरदार धुलाई केली आहे. सोशल मीडियात खासदार विप्लव ठाकूर यांचा व्हीडिओ चांगलाच गाजताना दिसत आहे.

धन्यवाद प्रस्तावावर मी बोलत आहे. पण मी धन्यवाद कोणत्या मुद्द्यावर करु हे कळत नाही. कारण जुन्याच गोष्टी नव्याने मांडण्यात आल्या आहेत. गेल्या सहा वर्षात तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या?, असा सवाल ठाकूर यांनी मोदी सरकारला केला आहे. अहिंसा काय असते हे तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्हाला शिक्षणच काठ्या देऊन केलं जातं. आता या काठ्यांची जागा बंदुकीने घेतली आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

आज जे तुम्ही विमानातून फिरत आहात, मोठ्या-मोठ्या विद्यापीठातून शिक्षण घेत आहात, ते काँग्रेसनं केलं आहे. मात्र, भाजपनं सहा वर्षात फक्त देश तोडण्याचं काम केलं, याच्याशिवाय काही केलं नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजप सरकारने त्याच जुन्या योजना मांडल्या आहेत. उज्वला, दिनदयाल, मिशन या जुन्याच योजना आहेत. यात रोजगाराबाबत काहीही नाही. कारण या सरकारला तरुणांसाठी काहीही करायचं नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

आज देशातील तरुणाला भिती आहे की, आम्ही डिग्री तर घेऊ पण आम्हाला नौकरी मिळणार का? तरुणाला त्याच्या भविष्याची चिंता लागली आहे. मात्र, याबाबत अभिभाषणात एक शब्दही नाही. हे अभिभाषण म्हणजे ‘मुंगेरीलाल के सपने’ आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“केंद्र सरकार चांगलं काम करतं त्यावेळी मी भाजपचं कौतुक केलं आणि काही चुकीचं दिसलं त्यावेळी सरकारवर टीकाही केली”

-“केंद्र सरकारला सांगतोय, पोलिसांना फक्त 48 तास द्या, मग बघा…”

-माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय?; असं म्हणत राज ठाकरेंनी दिलं सीएएला समर्थन

-“मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही; त्यांच्या मोर्चाला मी मोर्चानेच उत्तर दिलं आहे”

-सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर