Loading...
देश

केजरीवालांच्या जादुपुढे मोदी शहा फिके… तर फडणवीस-तावडे-मुंडे दिल्लीत सपशेल अपयशी

मुंबई |  दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने जोरदार मुसंडी मारली आहे. 70 जागांपैकी आप सध्या 57 जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत भाजपने एवढे कष्ट घेऊनही किंबहुना 200 खासदार आणि दिल्ली भाजप आणि केंद्रिय मंत्र्यांची फौज तसेच विविध राज्यातले भाजप नेते उतरवूनही त्यांना अपेक्षित यश मिळाल्याचं दिसत नाही.

महाराष्ट्र भाजपचे नेते दिल्लीच्या प्रचाराला गेले होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या सगळ्यांनी अरविंद केजरीवालांनी दिल्लीकरांची कशी दिशाभूल केली हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न फोल ठरल्याचं दिसून येत आहे. दिल्लीकरांनी पुन्हा केजरीवाल यांनाच साथ देत भाजपच्या नेत्यांना निष्प्रभ केलं आहे.

Loading...

दिल्ली विधानसभेचा गड काबीज करायला तसंच दिल्ली भाजपच्या मदतीला महाराष्ट्र भाजपची फौज गेली होती. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडलेली दिसून येत आहे. केजरीवाल यांनी तर ट्वीट करत प्रचाराला गेलेल्या विनोद तावडेंवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्राच्या सरकारी शाळा बंद पाडलेले शिक्षणमंत्री तावडेंना दिल्लीच्या सरकारी शाळा दाखवा, अशी टीका केली होती.

दरम्यान, जरी आम्हाला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी आमच्या पराजयात उद्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजपचे नेते सुधीर मुनटंगीवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत भाजपचा पराभव दिसू लागताच शिवसेनेची सडकून टीका तर ‘आप’वर स्तुतीसुमनं!

-दिल्लीत पैसा हरला… केजरीवालांचा विकास जिंकला- नवाब मलिक

-दिल्लीत ‘आप’ची जोरदार आघाडी; पाहा कोण किती जागांवर आघाडीवर

-दिल्लीमध्ये काहीही होऊ…. मी जबाबदार- मनोज तिवारी

Loading...