गद्दारांना पक्षात स्थान नाही म्हणत राज ठाकरेंनी या नेत्याला पक्षातून हाकललं!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेत गद्दारांना माझ्या पक्षात स्थान नाही, दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी गौतम आमराव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

गौतम आमराव हे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष होते. पक्षविरोधी कारवाया करणे आणि पक्षादेश न पाळणे यासाठी त्यांच्यावर कारवाई करत असल्याचं मनसेने पत्रक काढून म्हटलं आहे.

मनसे नेते शिरीष सावंत यांच्या सहीने मनसेने पत्रक काढून आमराव यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं सांगितलं आहे. त्यांना जिल्हाध्यक्ष तसंच सदस्यत्वपदावरून निलंबित करण्यात येत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

पक्षातील काही लोक गद्दार आहेत. ते अत्यंत खोट्या आणि चुकीच्या बातम्या माध्यमांना देत आहेत. अशा कार्यकर्त्यांची नावे माझ्याकडे आली आहेत. अशी लोकं मला पक्षात नको आहेत, असं राज ठाकरे औरंगाबादच्या मेळाव्यात म्हटले आहेत. आणि त्यांनी दौरा संपताच आमराव यांची हकालपट्टी करत पहिला दणका दिला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या ‘मशीदी’संदर्भातल्या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होईल- विश्व हिंदू परिषद

-मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली CAA, NRC आणि NPR बाबतची भूमिका!

-“MIM हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष आहे”

-15 कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा… आम्ही थुंकलो तरी तुम्ही वाहून जाल- मनसे

-अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जागा द्या, नाहीतर…- रामदास आठवले