कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

नवी दिल्ली |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीबांवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

1. सर्वांना आता मिळत असलेल्या धान्यापेक्षा 5 किलो गहू / 5 किलो तांदूळ जास्त मिळतील. पुढील 3 महिन्यांसाठी प्रत्येकी 5 किलो धान्य 1 किलो डाळ दिली जाईल.

2. आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याचं कवच मिळणार, 20 लाख कर्मचाऱ्यांना फायदा.

3. उज्ज्वला लाभार्थ्यांना पुढील 3 महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलिंडर मिळणार

4. देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये टाकले जाणार.

5. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. मजुरांच्या दैनंदिन वेतनात 200 रुपये वाढवण्यात आले आहेत.

6. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या विधवांना आगामी दोन महिन्यांसाठी 1 हजार रुपयांची मदत.

7. 20 कोटी महिलांना दरमहा मिळणार 500 रुपये

महत्वाच्या बातम्या –

-आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

-“मी मराठ्यांची लेक आणि सून; माझी बदनामी करणारे 80 टक्के तरुण मराठाच”

-लोकांनो कृपया गर्दी करू नका, आता सगळं व्यवस्थित होईल; मंत्री बाळासाहेब थोरातांना विश्वास

-कोरोनावर उपाय सुचवा, 42 लाख रूपये कमवा; केंद्र सरकारचं चॅलेंज

-बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार- अजित पवार