…तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी- नाना पटोले

यवतमाळ | हे सरकार जेव्हा शेतकरी आणि जनसामान्यांच्या विरोधात निर्णय घेईल तेव्हा राजदंडाचा वापर करू, असा इशारा विधानसभेचे अध्यक्ष नान पटोले यांनी सरकारला दिला आहे. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

महाराष्ट्र सरकारने ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव एकमताने मंजूर करून घेतला असला तरी ही वेळ केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची आहे. जनगणनेत जर ओबीसींचा कॉलम समाविष्ट करण्यात आला नाही, तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.

देशात बहुसंख्येने असलेल्या ओबीसींची जनगणना व्हावी ही मागणी अत्यंत रास्त आहे. त्याशिवाय या समाजघटकाला योग्य न्याय मिळणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ओबीसी कॉलम समाविष्ट करावा यासाठी दबाव निर्माण झाला पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांना रानडुकरांचा होत असलेल्या त्रासामुळे त्यांना मारण्याच्या परवानगीसाठी सर्व विभागांशी चर्चा करणार असल्याचंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

-‘झोपु’च्या नव्या कार्यालयावरुन अजित पवारांची नाराजी!

-देशाचे पंतप्रधान गांधीजींसमोर नतमस्तक होतात पण…- जितेंन्द्र आव्हाड

-मनसेत इनकमिंग सुरू; दोन दिग्गज नेत्यांनी केला प्रवेश

-मी महाराष्ट्राची लेकय; घाबरणारही नाही आणि गप्पही बसणार नाही- मानसी नाईक

-मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लाज वाटायला हवी- राजू शेट्टी