आता धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे पण राज्य सरकारची तशी तयारी दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | आता थोडे धाडसी निर्णय घ्यावे लागतील. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या दृष्टीने योजना तयार केली पाहिजे. पण सरकारचा तसा विचार दिसत नाही, अशी टीका विधासभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

उद्या चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांच पहिलं प्राधान्य महाराष्ट्राला असणार आहे. कारण महाराष्ट्र उद्योगात आघाडीवर आहे. कोरोनाचा काळ युद्धाची, आंदोलनाची तयारी करतो तसा आहे. कोरोनानंतरच्या काळात सर्व क्षेत्राचा विकास कसा करायचा, त्याचं प्लॅनिंग करुन ठेवावं लागणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

सरकारमधील तिन्ही पक्षामंध्ये अजिबात समन्वय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूप सावरून सावरून पावलं टाकत आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय लवकर होत नाही. सध्याच्या काळात आपली निर्णयक्षमता दाखवावी लागते, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील सरकारचं स्टेरिंग कोणाच्या हातात आहे हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि उद्ध ठाकरेंनीच सांगावं की स्टेरिंग नक्की कोणाच्या होतात आहे, असं फडमणीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही कारण…- राज ठाकरे

निष्ठावंतांना कात्रजचा घाट!; राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ‘या’ तरुणाची निवड?

काळजी करू नका, पुण्यातील परिस्थितीवर अजितदादांचं बारकाईनं लक्ष आहे- उद्धव ठाकरे

कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवांरानी चांगलंच झापलं; जनाची नाही तर…