आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे उजळण्याबाबत केलेल्या आवाहनावर राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी टीका केली होती, त्याला भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुनच प्रत्युत्तर दिलं आहे.

देश एका अवघड संकटाचा सामना करत असताना समस्त 130 कोटी देशवासी एकत्रितपणे या संकटाशी संघर्ष करत आहेत. या अंधकारमय परिस्थितीत तिमिराकडून प्रकाशाकडे जात असताना हातात आशेचा प्रकाशाचा दिवा घेऊन आम्ही 130 कोटी नागरिक या संकटाचा मुकाबला करायला एक आहोत हा एकतेचा संदेश, असं म्हणत राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या कोट्यवधी लोकांसाठी दिलेले मोफत धान्य कुठे गेले ?? दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत एक किलोही मोफत धान्य कोणत्याही गरिबापर्यंत पोहोचवला नाही??, असा सवाल राम कदम यांनी नवाब मलिक यांना केला आहे.

रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्या कामगारांना तातडीने किमान वेतन द्या”

-#ये_आदमी_पागल_हो_चुका_है ; मोदींच्या आवाहनानंतर सोशल मीडियात ट्रेंड सुरु

-जनता कर्फ्यूवेळी केलेली ‘ती’ चूक 5 एप्रिलला करू नका- नरेंद्र मोदी

-“प्रसिद्धी स्टंट बंद करून कोरोणा विरोधात काहीतरी ठोस पावलं उचला”

-“भारतीयांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे, ते नक्कीच कोरोनाला हरवतील”