कोरोनाचा असाही परिणाम; गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास!

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या. या लॉकडाऊनमुळे सर्वांना घरात बसाव लागत आहे. मात्र याचा फायदा आपल्या जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांना होताना दिसत आहे. त्यामुळे गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास

गेल्या अनेक वर्षांपासून गंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. केंद्र सरकारनं यासाठी विशेष प्रयत्नही सुरू केले आहेत. पण गंगा नदीच्या पाण्यात फारशी सुधारणा झाली नव्हती. लॉकडाउनमुळे हे होताना दिसत आहे. एका संशोधनातून गंगेच्या पाण्याची गुणवत्ता 40 ते 50 टक्क्यानं वाढली असल्याचं समोर आलं आहे.

गंगेच्या पात्रात जाणार एक दशांश दूषित पाणी आजूबाजूच्या कंपन्या आणि कारखान्यातील आहे. मात्र, लॉकडाउन लागू झाल्यानंतर कंपन्या आणि कारखाने बंद आहे. दहा दिवसांपासून हे उद्योग बंद असल्यानं गंगेच्या पाण्याची गुणवत्ता सुधारताना दिसत आहे. तब्बल 40 ते 50 टक्के पाणी शुद्ध झाले आहे. ही चांगली सुधारणा असल्याचं डॉ. मिश्रा यांनी सांगितल.

दरम्यान, औद्योगिक वसाहतींमध्ये शुकशुकाट असून याचा परिणाम जलशुद्धीकरण मोहिमेला बळ देणारा ठरला आहे. गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!

-दर्यादिल दादा… लॉकडाऊन काळात 10 हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली

-विराट कोहली अन् रो’हिट’ शर्माचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा; केलं हे आवाहन

-पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

-‘कोरोना’काळातही काका-पुतण्यांमध्ये जुंपली; होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागर म्हणाले…