“…तर मी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे टॉपलेस होईन”

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिचा लाॅकअप (lockupp) शो मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. अनेक धक्कादायक फुटेज आणि वक्तव्य या शो मधून बाहेर येत आहेत. स्पर्धा जिंकण्यासाठी स्पर्धक आता कोणत्याही थराला जाण्याची शक्यता आहे.

अशातच आता अभिनेत्री आणि माॅडल पूनम पांडे (Poonam Pandey) हीने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जणू काही तिने स्पर्धा जिंकण्यासाठी ऑफरच दिली आहे. मला यावेळी जिंकून दिलंत तर मी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे टॉपलेस होईन, असं वक्तव्य पूनम पांडे हिने केलं आहे.

मागील झालेल्या एका एपिसोडमध्ये पुनम पांडे बिकनी घालून खुल्या जागेत अंघोळ करताना दिसला होती. त्यानंतर अनेकांनी या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले होते.

शिवम शर्मा पहिल्यापासूनच शोच्या अंतिम फेरीत प्रवेश कराणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. त्यामुळे आता इतर स्पर्धकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

सायशाने प्रथम पूनमला टास्कमधून धोका दिला आणि नंतर मुनव्वरला जिंकण्यासाठी मदत केली. त्यामुळे आता बझरचा प्रश्न मोकळा झाला आहे.  या सर्व प्रकारात पुनम पांडे स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता असल्याने आता तिने हे खळबळजनक वक्तव्य केल्याचं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“देवेंद्र फडणवीस वर्षभरात राज्याचे मुख्यमंत्री होतील”, चंद्रकांत पाटलांचा दावा

 पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ