जनतेला धान्याऐवजी थेट पीठ देणार- बाळासाहेब थोरात

मुंबई | जनतेचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना धान्याऐवजी थेट पीठ देण्याचं नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच लॉकडाऊनला जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यात लॉकडाऊन असला तरी जनतेने घाबरून जाण्याचं कारण नाही. जनतेला जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळणार आहेत. त्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नाहीत. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टिंग मशीन आणण्यात आलेले आहेत. त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरीला इंधन दिले जाईल, असं थोरात यांनी सांगितलं.

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये, अशा आशयाच्या सूचना आम्ही प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-मारहाण करुन पोलिसाचे हात दुखले; मुख्याध्यापकाला सांगितलं, लोकांना हाणा!

-महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 124 वर; मुंबई-ठाण्यात नवे रुग्ण सापडले

-‘देवदूतां’च्या मदतीला सिद्धिविनायक; लॉकडाऊनमध्ये पोलिसांसाठी जेवणाची सोय

-कौतूकास्पद! Parle G कंपनी पुढच्या 3आठवड्यात वाटणार 3 कोटी बिस्किट पुडे

-“ आईशपथ, मी संजय राऊत यांना प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं”