Loading...
महाराष्ट्र मुंबई

आम्ही कधी एकमेकांवर कंबरेखालचे वार केले नाहीत- जितेंद्र आव्हाड

मुुंबई| एकनाथ शिंदे आणि आमची मैत्री आधी लपूनछपून होती परंतु आता आम्ही उघडपणे मैत्री करत आहोत. विरोधीपक्षात असतानादेखील आम्ही कधी एकमेकांवर कंबरेखालचे वार केले नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते ग्रृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

काही वेळा राजकारणात मित्र तोंडावर गोड बोलतात, स्तुती करतात आणि प्रत्यक्षात कंबरेखाली वार करून मोकळे होतात. अशा लोकांमुळेच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे, असं म्हणत आव्हाडांनी भाजपवर निशाणा साधला.

Loading...

ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आव्हाड बोलत होते. ठाकरे यांच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटतं. आजपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यासोबत काम करताना असं कम्फर्टेबल वाटलं नाही, हे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केल.

किसननगर भागात क्लस्टर योजना राबवली आहे. परंतु मुंब्र्यातदेखील अशा अनाधिक्रृत, धोकादायक इमारती उभ्या आहेत, त्यामुळे तिथेही ही योजना राबवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एमएमआर रिजन मध्ये ही योजना राबविल्यास सर्वांना हक्काचे घर मिळेल, असं आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान

-खळबळजनक! सांगलीत आठवड्याभरात 2 राष्ट्रवादी नेत्यांच्या हत्या

-“एक केजरीवाल सगळ्यांना भारी पडतायत; मागच्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामांवर मतं मागितली”

-पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींना ‘ट्युबलाईट’ची उपमा!

Loading...