कै.आर.आर.(आबा) पाटलांच्या नावाने सरकार देणार ‘हा’ पुरस्कार!

सांगली |  कै.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंजनी येथील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज पुरस्काराचे ‘कै. आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार’ असे नामकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

आबा हे लोकांच्या मनातील नेते आहेत. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. या थोर नेत्याची समाधी असलेल्या निर्मलस्थळाची प्रलंबित कामे येत्या वर्षभरात पूर्ण करून ते विकसित करणार, या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

आबा पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ८ कोटी ७० लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून देणार आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वच विकास कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर केला”

-चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागतोय; इंदुरीकरांची पुन्हा उद्वीग्न प्रतिक्रिया

-…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं- अजित पवार

-लोकांना मोफत योजना घेण्याची सवय लावू नका- अजित पवार

-महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणारच!; शरद पवारांना विश्वास