चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागतोय; इंदुरीकरांची पुन्हा उद्वीग्न प्रतिक्रिया

बीड | ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर  बीडच्या कढा येथे कुंभारवाडीत इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा उद्वीग्न झाल्याचं पाहायला मिळाले.

सर्वजण विचारतायत की एवढं काय झालं. पण, सध्या माझे दिवसच खराब सुरु आहेत. चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागत आहे, असं ते म्हणाले आहेत. महाराज गावात आले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. तसेच गावकऱ्यांनी महाराजांच्या समर्थनाचे पोस्टर हातात घेतले होते.

सध्या सुरु असलेल्या वादामुळे मला प्रचंड मनस्ताप होत आहे. हा वाद इथेच थांबला नाही, तर सर्व सोडून शेती करणार असल्याचं महाराजांनी यापूर्वी म्हटलं होतं.

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य महाराजांनी कीर्तनादरम्यान केलं होतं. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला असून महाराजांवर टीका होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं- अजित पवार

-लोकांना मोफत योजना घेण्याची सवय लावू नका- अजित पवार

-महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणारच!; शरद पवारांना विश्वास

-तू राजकारणात आलीस. तुझा भाऊ का नाही?; पूनम महाजन म्हणतात…

-“शेतकऱ्यांनो आता वीज बीलं भरुच नका”