काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींना अज्ञातांकडून मारहाण

नवी दिल्ली | काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांच्या दिल्लीताल निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी अधीर रंजन चौधरी यांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.

संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हल्लेखोर घरात घुसले. हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली असून त्यासोबत हल्ल्यात घरी उपस्थितीत असलेल्या स्टाफलाही मारहाण करण्यात आली आहे.

रंजन चौधरी यांच्या घरातील सामानाची मोडतोड केली आहे. चौधरी यांनी मारेकरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मारेकऱ्यांनी त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालच्या बेरहमपूर मतदारसंघाचे खासदार आहेत.  ते लोकसभेतील वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. भाजपविरोधात ते आक्रमकपणे बोलत असतात.

 

महत्वाच्या बातम्या- 

-शेण आणि गोमूत्रामुळे कोरोना रोखता येवू शकतो; भाजप आमदाराचा अजब दावा

-हिंमत असेल तर सांगाच, आम्ही मुस्लिमांना आरक्षण देवू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

-बौद्ध समाजावर टीका करत अभिनेत्री केतकी चितळेनं फोडलं नव्या वादाला तोंड!

-“सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा”

-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडणार फडणवीसांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा