‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

मुंबई | कोरोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारने दिलासादायक घोषणा केली आहे. ‘कोरोना’ संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे.

राज्यातील पोलिस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. आरोग्य, वैद्यकीय, पोलिस विभागांना प्राधान्याने वेतन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मार्च महिन्याचे वेतन प्राधान्याने देणार असल्याचंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक पद्धतीनं वाढत आहे. महाराष्ट्रात ही संख्या नियंत्रणात रहावी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

महत्वाच्या बातम्या –

-आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

-“लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्या कामगारांना तातडीने किमान वेतन द्या”

-#ये_आदमी_पागल_हो_चुका_है ; मोदींच्या आवाहनानंतर सोशल मीडियात ट्रेंड सुरु

-जनता कर्फ्यूवेळी केलेली ‘ती’ चूक 5 एप्रिलला करू नका- नरेंद्र मोदी

-“प्रसिद्धी स्टंट बंद करून कोरोणा विरोधात काहीतरी ठोस पावलं उचला”