दिल्लीनंतर भाजपचं मिशन महाराष्ट्र; ऑपरेशन लोटसची तयारी?

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहेत. तर 11  फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली निवडणुकीनंतर भाजप महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये ‘मिशन कमळ’ राबवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र पुन्हा काबीज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला सोबत घेणार की राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, शिवसेनेनं काडीमोड घेत वेगळी वाट धरली. त्यामुळे 105 जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. मात्र, भाजप पुन्हा अ‌ॅक्शन मोडमध्ये येणार असून राज्यात सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याचं कळतंय.

महाराष्ट्रात पर्याय काय यावरुन भाजपमध्ये दोन मतप्रभाव आहेत. शिवसेनेसोबत जायचं की राष्ट्रवादीसोबत याबाबत मतभेद आहेत. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी भाजप साम, दाम, दंड, भेद अशा सर्व शक्तींचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-केजरीवाल सरकारचं ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवा; शिवसेनेचा नरेंद्र मोदींना सल्ला

-आम्ही कधी एकमेकांवर कंबरेखालचे वार केले नाहीत; आव्हाडांचे भाजपवर टीकास्त्र

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान

-मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; शिवसेनेला मनसेचं जाहीर आव्हान

-खळबळजनक! सांगलीत आठवड्याभरात 2 राष्ट्रवादी नेत्यांच्या हत्या