“राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष होणार, आपला मुख्यमंत्री झालाच पाहिजे”

कोल्हापूर | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. कामाचा प्रचार होण्यासाठी बुथ कमिट्या सक्षम कराव्यात. हे जर झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले होते.

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरमध्ये समारोप झाला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी भाषण केलं.

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत. पण, या निवडणुकीत आता आपलाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, असा निर्धार करावा, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे यांनी खुलेआम शरद पवारांसमोर हे वक्तव्य केल्याने आता सर्वत्र एकच चर्चेला उधाण आलं आहे. 105 आमदार असलेले भाजप विरोधात बसले. यालाच होत्याचं नव्हतं आणि नव्हत्यांचं होतं म्हणतात, असा टोला धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, ज्याला कुणाला लोकप्रिया मिळवायची असेल तर तो शरद पवार यांच्यावर आरोप करतो, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘लग्न झालेल्या पुरुषांमध्ये…’; आझमा फलाहच्या वक्तव्याची एकच चर्चा

“निव्वळ लज्जास्पद, एवढीच तुमची मदुर्मकी?…”, राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर फडणवीस कडाडले

BIG BREAKING: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

आत्ताची मोठी बातमी! राणा दाम्पत्यास अखेर अटक; पोलीस स्टेशनबाहेर तणावाचं वातावरण

“मर्द आहात ना?…”, नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल