“केंद्र सरकार चांगलं काम करतं त्यावेळी मी भाजपचं कौतुक केलं आणि काही चुकीचं दिसलं त्यावेळी सरकारवर टीकाही केली”

मुंबई |  केंद्र सरकारच्या काही धोरणांवर टीका केली म्हणजे भाजपविरोधी होत नाही. ज्यावेळी केंद्र सरकार चांगलं काम करतं त्यावेळी मी भाजपचं कौतुक केलं आणि ज्यावेळी काही चुकीचं दिसलं त्यावेळी सरकारवर टीकाही केली, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी यावेळी घुसखोरांच्या प्रश्नांवर बोट ठेवले. बांग्लादेशातून 2 कोटी घुसखोर आले आहेत, पाकिस्तानातून किती आले कल्पना नाही..आम्ही हिंदू बेसावध..आम्ही दंगल झाली की हिंदू होतो, असं ते म्हणाले आहेत. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटला का? कुठूनही येणार आणि राहणार, घुसखोरांचा प्रश्न मोठा आहे, प्रत्येक वेळी माणूसकीचा ठेका नाही घेतला भारताने, जगातील प्रत्येक देश त्यांच्या नागरिकांसाठी कठोर पावलं उचलतात, असं राज म्हणाले आहेत.

इथल्या आणि तिथल्या गृहमंत्र्यांना मी सांगणार आहे, एक जागा आहे, जिथे अनेक देशातील मुल्ला-मौलवी येत आहेत, तिथे मोठं काहीतरी षडयंत्र रचलं जात आहे, हे पोलिसांनीच मला सांगितलं. या राज्य सरकारला सांगून उपयोग नाही, केंद्राला सांगितलं पाहिजे..पोलिसांना हात सोडून मुभा द्या 48 तास ते काम करून दाखवतील..पण त्याचे हात बांधले गेले आहेत, असं राज म्हणाले आहेत.

2012 च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता. ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे. नायझेरिअन्स ड्रग्स विकतात, महिलांची छेड काढतात मात्र त्यांच्यावर कारवाई शुन्य आणि खापर मात्र पोलिसांवर फोडलं जातं. या घुसखोरांचं काय करणार, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“केंद्र सरकारला सांगतोय, पोलिसांना फक्त 48 तास द्या, मग बघा…”

-माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय?; असं म्हणत राज ठाकरेंनी दिलं सीएएला समर्थन

-“मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही; त्यांच्या मोर्चाला मी मोर्चानेच उत्तर दिलं आहे”

-सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर

-महात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण