मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचं हिंगणघाट पीडितेला पत्र

मुंबई |  हिंगणघाटच्या पीडितेचा मृत्यू झाला अन् अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. या घटनेवर अनेक स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. आरोपीला लवकरात शिक्षेची मागणी करत पीडितेच्या गावकऱ्यांनी थेट कायदाच हातात घेतल्याचंही चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रात संतापाचं वातावरण असताना  मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी समाजाच्या डोळ्यात उपरोधिक पत्र लिहलं आहे.

महिला समान न्याय, समान संधी, समान वेतन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषांच्या मदतीने समान सन्मान देणारी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तुझं निर्भया’ नाव ठेवणं आम्हाला अधिक सोईस्कर वाटतं, असं उपरोधिकपणे शालिनी ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

कुणी तरी तुझ्यावर अ‍ॅसिड टाकतं, कुठेतरी तुझ्यावर बलात्कार होतो किंवा कधीतरी तुला रॉकेल टाकून पेटवून दिलं जातं… मग तुझं खरं नाव समाजाला समजू नये. तुझी ओळख उघड होऊन तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या वेदना आणखी वाढू नयेत म्हणून आम्ही तुझं नामकरण करतो- ‘निर्भया’. जी कुणालाही घाबरत नाही. जिला कसलंही भय नाही ती ‘निर्भया’!, असं शालिनी ठाकरेंनी लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, शालिनी ठाकरेंनी हे खरमरीत पत्र लिहीत समाजाच्या डोळ्यात अंजन घातलं आहे. या प्रकरणावरुन तरुणींना शिक्षण घेण्यासाठी बाहेर पाठवण्याची भिती आता राज्यातील अनेक पालकांनी व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-अमित शहाजी, राजेंना खासदार करून मंत्री करा; चाहत्याने लिहिलं रक्ताने पत्र

-आपले गडकिल्ले ही छत्रपतींची देण…. हेच वैभव जगाला दिमाखात दाखवणार- उद्धव ठाकरे

-धक्कादायक… मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे आई-वडिल अन् भावाने केली आत्महत्या!

-आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय अनुसुचित जाती जमातींवर अन्याय करणारा- आठवले

-ती आपल्याला कायमचं सोडून गेली…; आनंद महिंद्रा यांचं ते ट्वीट व्हायरल