राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार विधानसभा उपाध्याक्षपदाची माळ?

मुंबई | विधानसभेचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची नेमणुक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच होणार असल्याची माहिती आहे.

दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचं नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे हे पद त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलं होतं. मात्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी अद्याप कुणालाही देण्यात आलेली नाही.

सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी उपाध्यक्षपदाची जबाबदारी नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील लोकांचे ते प्रतिनिधित्व करतात.

महत्वाच्या बातम्या- 

-दिराने माझा मानसिक आणि लैंगिक छळ केला; सुन डॉ. गौरी चव्हाणांचा गंभीर आरोप

-काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींना अज्ञातांकडून मारहाण

-शेण आणि गोमूत्रामुळे कोरोना रोखता येवू शकतो; भाजप आमदाराचा अजब दावा

-हिंमत असेल तर सांगाच, आम्ही मुस्लिमांना आरक्षण देवू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

-बौद्ध समाजावर टीका करत अभिनेत्री केतकी चितळेनं फोडलं नव्या वादाला तोंड!