त्या राक्षसाला माझ्यासमोर जाळून मारा; पीडितेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

वर्धा | वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून पीडितेच्या वडिलांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिेजे. आरोपीला आमच्या स्वाधीन करा, अशी उद्दीग्न प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसेच निर्भयाच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यास ज्याप्रमाणे उशीर होत आहे, तसं न होता लवकरात लवकर आरोपीला शिक्षा द्या, असं ते म्हणाले आहेत.

पीडितेच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यातून होत आहे. तसेच जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत पीडितेचे पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

दरम्यान, आज सकाळी 6.55 मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. सकाळी दोनच्या सुमाराच पीडितेला ह्रद्यविकाराचा झटका आला होता. हिंगणघाट येथील मेडिलक बुलेटीनमध्ये डाॅक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

-हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी

-“राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच!”

-काॅंग्रेसच्या महिला खासदाराचा ‘हा’ व्हीडिओ तुफान व्हायरल

-“केंद्र सरकार चांगलं काम करतं त्यावेळी मी भाजपचं कौतुक केलं आणि काही चुकीचं दिसलं त्यावेळी सरकारवर टीकाही केली”