देश

दिल्लीचा गड आम्हीच जिंकणार; भाजपच्या मनोज तिवारींचा दावा!

नवी दिल्ली | संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.

माझं अंतर्मन सांगतंय की दिल्ली भाजपच जिंकणार, असा दावा भाजप नेते मनोज तिवारी यांनी केला आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Loading...

दिल्ली विधानसभा निवडणूक आपसाठी अटीतटीची, भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कसोटी पाहणारी तर काँग्रेससाठी अस्तिात्वाची लढाई आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गोपाल राय, भाजपचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, अलका लंबा हे महत्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे गाजले.

महत्वाच्या बातम्या- 

-साहेब, हेल्मेट तुटलंय, पैसे संपलेत मला पकडू नका; पुणे पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

-झेंडा आणि अजेंडा बदलताच राज ठाकरेंचा जुना भिडू पक्षात परत!

-52 वर्ष, सलग 14 वेळा तुम्ही मला निवडून दिलं…; आळंदीच्या कार्यक्रमात शरद पवार भावूक

-मिसळ प्रेमींना दिलं नितेश राणेंनी हटक्या अंदाजात निमंत्रण

-शरद पवारांनी तरुणाला विमानातून दाखवला चाकण अन् मगरपट्टा; मराठवाड्याच्या तरूणाला झालं आभाळ ठेंगणं