Top news देश

अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका; RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या मोठ्या घोषणा

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवप रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी केली.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीर रिझर्व्ह बँकेकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही 0.90 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. कोरोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाचा सामना करण्यासाठी शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

-आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

-“मी मराठ्यांची लेक आणि सून; माझी बदनामी करणारे 80 टक्के तरुण मराठाच”

-लोकांनो कृपया गर्दी करू नका, आता सगळं व्यवस्थित होईल; मंत्री बाळासाहेब थोरातांना विश्वास